'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'

जरांगे पाटील यांचा धनंजय व पंकजा मुंडे यांना इशारा

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'

जालना: प्रतिनिधी 

छगन भुजबळ यांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध केला तर तुमचा नाश होईल. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना दिला आहे. 

आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही काळापासून ज्येष्ठ मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एकमेकांना सतत भिडत आहेत. जरांगे यांच्याकडून भुजबळ यांना सातत्याने टीकेचे लक्ष्य केले जात आहे. 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र, हा निर्णय बेकायदेशीर असून तो रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसचे विधानसभेतील गटनते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचप्रमाणे विधी व न्याय विभागाचे मत न घेता हा निर्णय लागूच कसा केला, असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. 

हे पण वाचा  'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... '

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. या निर्णयाच्या विरोधात आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जाऊ नये, ही त्यांची आग्रही मागणी आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार आणि भुजबळ या दोघांवरही टीका केली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या मंचावर जाऊन जे कुणी त्यांना पाठिंबा देतील, त्यांना निवडणुकीत मराठा समाज धडा शिकवेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt