वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर

१७ प्रभागांपैकी तब्बल ८ प्रभाग महिलांसाठी राखीव

वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर

वडगाव मावळ /सतिश गाडे 

पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली असून, यावेळी महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. एकूण १७ प्रभागांपैकी तब्बल ८ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत.

लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. हा कार्यक्रम नगरपंचायत कार्यालयात आज सकाळी ११ वाजता संपन्न झाला.उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, नागरिक आणि नगरपंचायतीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहीर झालेली आरक्षण यादी पुढीलप्रमाणे —

हे पण वाचा  आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्की तर चालकाला मारहाण

प्रभाग क्र. १ – अनुसूचित जमाती (ST) महिला

प्रभाग क्र. २ – ओबीसी सर्वसाधारण

प्रभाग क्र. ३ – सर्वसाधारण

प्रभाग क्र. ४ – ओबीसी महिला

प्रभाग क्र. ५ – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ६ – ओबीसी सर्वसाधारण

प्रभाग क्र. ७ – अनुसूचित जाती (SC) सर्वसाधारण

प्रभाग क्र. ८ – ओबीसी महिला

प्रभाग क्र. ९ – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. १० – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. ११ – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १२ – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १३ – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १४ – अनुसूचित जाती (SC) महिला

प्रभाग क्र. १५ – सर्वसाधारण

प्रभाग क्र. १६ – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. १७ – सर्वसाधारण महिला

महिला आरक्षणामुळे काही प्रभागांतील इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये निराशा दिसून आली, तर काही प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्यांनी उत्साहाने तयारी सुरू केली आहे.सोडत जाहीर होताच सोशल मीडियावर “भावी नगरसेवक” या नावाने पोस्टांचा पाऊस पडू लागला असून, स्थानिक राजकारणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या (९ ऑक्टोबर) प्रारूप आरक्षण रचना प्रसिद्ध होणार आहे. ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

Advt