- राज्य
- आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
बँक खाती गोठवली, बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई
पुणे: प्रतिनिधी
शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून आंदेकर, घायवळ यांच्या पाठोपाठ टिपू पठाण टोळीवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. या टोळीतील गुंडांची बँक खाती पोलिसांनी गोठवली असून बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या टिपू पठाण आणि त्याच्या टोळीतील सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख, मुनीर शेख आदींची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यांच्या घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांच्या बिलांची मागणी केली असता हे गुंड किंवा त्यांचे नातेवाईक बिले सादर करू शकलेले नाहीत. टिपू पठाणच्या घरातून पोलिसांनी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू जप्त केले आहेत.
टिपू पठाण याने काळेपडळ येथे अनधिकृतपणे उभारलेले कार्यालय आणि अन्य बांधकामे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कडक पोलिस बंदोबस्तात पाडून टाकली आहेत.