- राज्य
- अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी
व्यावसायिकाची ६० कोटीची फसवणूक केल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
एका व्यावसायिकांकडून व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेले ६० कोटी ४८ लाख रुपये स्वतःसाठी वापरून फसवणूक केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल चार तास चौकशी केली आहे.
सन २०१५ ते २३ या कालावधीत राज कुंद्रा याने व्यावसायिकांकडून व्यवसाय वाढवण्यासाठी ही रक्कम घेतली. त्यापैकी १५ कोटी रुपये शिल्पाच्या जाहिरात कंपनीच्या खात्यावर वळवण्यात आली, असा आरोप आहे. मात्र, राज आणि शिल्पा यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेकडून राज आणि शिल्पा यांच्या प्रवासाचे तपशील देखील तपासण्यात येत आहे. त्यांना प्रदेशात जाण्यापासून रोखता यावे यासाठी लुकाऊट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे.
हा एक जुना आर्थिक करार असून आर्थिक नुकसानामुळे त्यामध्ये अडचणी निर्माण झाले आहेत. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी नाही. हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने 4 ऑक्टोबर 2024 रोजी निकाली काढले आहे, असा दावा राज कुंद्रा यांच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि खुलासे आपल्या लेखापरीक्षकांनी आर्थिक गुन्हे शाखेला सोपविले आहेत, असेही त्यांनी सांगितले.