'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे'

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रथमच पवार यांच्यावर आरोप

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे'

छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण सन 1994 मध्ये इतर मागास प्रवर्गाला दिले आणि मराठ्यांचे वाटोळे केले, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे यांनी प्रथमच पवार यांच्यावर जाहीरपणे आरोप केले आहे. 

आम्हाला आमच्या हाताने आरक्षण मिळणार आहे. मात्र, प्रत्यक्षात ते 94 सालीच मिळाले असते. मात्र, शरद पवार यांनी मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण ओबीसींना दिले. पवार यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ओबीसी समाजाने ठेवली नाही, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. ओबीसी नेत्यांनीच त्यांच्या समाजाचे नुकसान केले, असा आरोपही त्यांनी केला. 

विजय वडेट्टीवार व छगन भुजबळ यांची गुप्त बैठक 

हे पण वाचा  राज्याच्या त्रिमूर्तीपैकी कोणी बनिया नाही तरी त्यापेक्षा कमीही नाही

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेतृत्व करण्याबाबत मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मी महायुती सरकारमध्ये मंत्रीपद घेऊन अडकून पडलो आहे. त्यामुळे या आंदोलनाचे नेतृत्व विजय वडेट्टीवार यांनी करावे, असे भुजबळ यांनी सांगितले, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. मात्र, वडेट्टीवार यांनी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे सांगितले आहे. 

जरांगे नाहीत मराठ्यांचे नेते 

आरक्षणाच्या प्रश्नावर मागील काही काळापासून छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. जरांगे पाटील यांना विनाकारण मराठा समाजाने डोक्यावर बसवून घेतले आहे. वास्तविक ते काही संपूर्ण मराठा समाजाचे नेते नाहीत, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt