'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन'

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन'

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे अभूतपूर्व संकट ओढवले असताना त्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार जास्तीत जास्त मदत देईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत मिळावी यासाठी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे फडणवीस आणि मोदी यांच्यात राज्यावरील संकटाबाबत तब्बल तासभर चर्चा झाली. फडणवीस यांनी मोदी यांना राज्यातील परिस्थिती सविस्तरपणे कथन केली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निकषांच्या पलीकडे जाऊन केंद्राकडून आर्थिक मदतीची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. 

या विनंतीला पंतप्रधान मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्याकडून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. केंद्र सरकार तातडीने जास्तीत जास्त मदत करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

हे पण वाचा  आणखी महिनाभर पाऊस सोडणार नाही पिच्छा

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्राचा दौरा करण्याची शक्यता देखील पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर vykt करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याला मदत मिळण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग मिळू शकणार आहे.

About The Author

Advertisement

Latest News

Advt