- राज्य
- 'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'
'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'
अजित पवार यांनी भूम परांडा दौऱ्यात दिली ग्वाही
सोलापूर: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी निधीची चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार सकाळी लवकरच धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची, मदत व बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच, जातीने शेतकऱ्यांशी देखील प्रत्यक्ष संवाद साधला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करून वेगाने काम पूर्ण केले जाईल. आम्ही देखील प्रत्यक्ष पाहणी करून तुमच्याकडून परिस्थिती समजावून घेत आहोत. लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अतिवृष्टी ग्रस्त आणि पूर परिस्थिती असलेल्या परिसरात पाहणी करत आहेत.