- राज्य
- आणखी महिनाभर पाऊस सोडणार नाही पिच्छा
आणखी महिनाभर पाऊस सोडणार नाही पिच्छा
ऑक्टोबर महिन्यातही राज्याच्या बहुतांश भागात पाऊस लावणार हजेरी
पुणे: प्रतिनिधी
ऑक्टोबरला सुरुवात होऊन देखील माननच्या पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पर्जन्यमान अधिक राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
या वर्षी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे महाराष्ट्राला संकटात टाकले आहे. अभावग्रस्त समजल्या जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भ या प्रदेशांना अतिवृष्टी आणि महापुराला सामोरे जावे लागले आहे. खरीप हंगामाची पिके पाण्याखाली गेली असून हजारोंच्या संख्येने जनावरे वाहून गेली आहेत. अनेक ठिकाणी जमीन खरडून शेतातील माती वाहून गेली आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. एवढे झाल्यानंतर देखील पावसाने निरोप घेण्याचे नाव घेतलेले नाही.
राज्यात या वर्षी 120 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात 1189.4 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. या वर्षी असून 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.