'सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील हा संघाचा माणूस'

आमदार रोहित पवार यांचा आरोप

'सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील हा संघाचा माणूस'

छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. सर्वोच्च न्यायालयावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून या देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा संघाचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. 

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यावेळी पवार बोलत होते. 

सरन्यायाधीश गवई हे शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीचे आहेत. ते मोठ्या कष्टातून या पदापर्यंत पोहोचले आहेत. अशा व्यक्तीवर मनुवादी विचाराच्या व्यक्तीने बूट फेकणे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे रोहित पवार यांनी नमूद केले. जातीवादी प्रवृत्तीचे लोक देशातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

हे पण वाचा  'हा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडे कसा गेला?'

बारामती येथेही खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मुंबई व पुणे येथेही काँग्रेसच्या वतीने सरन्यायाधीशांवर बूट फेकल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीवर बूट फेकण्याची घटना अस्वस्थ करणारी, चीड आणणारी आणि संविधानाचा अवमान करणारी असल्याचे काँग्रेसच्या वतीने नमूद करण्यात आले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt