एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार

मुंबई: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही देणे घणे नाही. त्यांना मराठी माणसात फूट पाडायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही त्यांच्या हातातील हत्यारे आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्याबद्दल भाजपच्या मनात प्रेमाचे झरे वाहत आहेत असे काही नाही. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडायची होती. त्यासाठी त्यांनी यांचा वापर केला. आता मराठी. माणसात फूट असण्यासाठी करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. 

मुंबई गिळण्याचा भाजपचा डाव आहे. त्यासाठी ते मुंबईत महायुती म्हणून लढणार आहेत. शिंदे यांचा पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची बेनामी कंपनी आहे. शिवसेनाअखंड असताना. भाजपाला किती जागा द्यायच्या हे आम्ही ठरवत होतो. आता शिंदे जागा मागण्यासाठी भाजपच्या दारात उभे आहेत. मात्र, त्यांना शंभर जागाही मिळणार नाहीत. पाच पंचवीस जागांवर त्यांची बोळवण केली जाईल, अशी शक्यता राऊत यांनी वर्तवली. 

हे पण वाचा  अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

शिंदे गटातील माणसे सुपारीबाज 

शिंदे गट हा सुपारीबाज माणसांचा गट आहे. ते सुपारी घेतात. मराठी माणसामध्ये फूट पाडा, त्यांची मते फोडा ही सुपारी त्यांना मुंबई महापालिकेत भाजपकडून देण्यात आली आहे आणि ती त्यांनी घेतली आहे. एरवी त्यांची महायुती अनैसर्गिक आहे. त्यामुळे ठाण्यात स्वतंत्र लढू असे भाजप म्हणतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्र लढू, अशी भूमिका अजितदादा घेतात, असे राऊत म्हणाले. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt