- राज्य
- पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटींचा घोटाळा
पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटींचा घोटाळा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप
पुणे: प्रतिनिधी
पुणे मेट्रो प्रकल्पात भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तर शिवसेना शिंदे गटाच्या दोघांनी तब्बल 12 हजार रुपये वाटून घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुण्याचे प्रशासन तीन टोळीप्रमुख चालवत आहेत. प्रशासकीय कामेही त्यांनी सोयीनुसार वाटून घेतली आहेत, असे आरोपही त्यांनी केले.
पुण्याचे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे सर्व अधिकारी यांनीच नेमलेले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त तर भाजपचे कार्यकर्तेच आहेत, असा आरोपही राऊत यांनी केला.
फडणवीस हे कमिशनवरचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राऊत यांनी कठोर टीका केली. फडणवीस यांनी मुंबई उद्योगपती गौतम अदानी यांना विकली आहे. ते कमिशन वर काम करणारे मुख्यमंत्री आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी कानात गोळे घातले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात येईल, असे राऊत म्हणाले. फडणवीस हा फार कंजुष माणूस आहे. त्यांनी अतिवृष्टी आणि पूरस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणे गरजेचेहिते, असेही राऊत यांनी नमूद केले.
भाजप हा पक्ष नव्हे तर टोळी
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचे राऊत यांनी कौतुक केले. खरा दसरा मेळावा फक्त उद्धव ठाकरे यांचाच! बाकीचे लोक बोगस, भंपक आहेत. भाजपवर विश्वास ठेऊ नका. भाजप हा पक्ष नाही तर ती एक टोळी आहे, असे टोलेही राऊत यांनी लगावले.