राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर

बदलणार सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे

राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर

सोलापूर: प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा येथील आमदार नारायण पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्यांनी यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मोहोळ च आमदार राजू खरे यांनी शरद पवार गटाला यापूर्वीच राम राम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

करमाळा येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्याला आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली. इतर कोणत्याही गटातटाचा किंवा पक्षाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 

आमदार पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. यापूर्वी भारतीय जनता पक्षात असलेला विजयसिंह मोहिते पाटील गट लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार यांच्याकडे परतला आहे. मात्र, आमदार खरे यांच्या पाठोपाठ आमदार पाटील यांनी शिंदे गटाची कास धरल्याने जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

हे पण वाचा  ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

About The Author

Advertisement

Latest News

Advt