- राज्य
- '... तर हे आजपर्यंतचे सर्वात नालायक सरकार'
'... तर हे आजपर्यंतचे सर्वात नालायक सरकार'
जरांगे पाटील यांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर घणाघात
बीड: प्रतिनिधी
मराठा मारण्याचा कट करणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडें यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालणार असतील तर हे सरकार आतापर्यंतचे सर्वात नालायक सरकार ठरेल, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना साकडे घातल्याचा दावाही त्यांनी केला.
मुंडे यांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप जणांनी पाटील यांनी केला होता. हे आरोप नाकारत मुंडे यांनी या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अर्थात सीबीआय चौकशीची मागणी केली. आपली नार्को टेस्ट केली जावी आणि जरांगे यांचीही हीच तपासणी करावी, अशी मागणी ही मुंडे यांनी केली.
मात्र, प्रत्यक्षात हा चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना विनवणी केल्याची माहिती मिळाली आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. खरोखरच चौकशी झाली आणि त्याच आपले बिंग उघडे पडले तर मराठा समाजाचे लोक मला मारतील. त्यामुळे माझी या चौकशीतून सुटका करा, अशी विनवणी मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती मिळाली आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
आपला आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास होता. मात्र, आता आपला फडणवीस, पवार यांच्यावर विश्वास उरलेला नाही. धनंजय मुंडे यांच्यासारख्या कारस्थानी माणसाला जर वडणवीस आणि पवार पाठीशी घालत असतील तर ही साधी गोष्ट नाही, असे जरांगे यांनी नमूद केले.

