भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले
रमेश जाधव, पुणे ( रांजणी )
घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वबळावर सामाजिक कार्य करता करता राजकारणात आपले नशीब अजमाऊ पाहणारं आंबेगाव तालुक्यातील मंचर ( निघोटवाडी ) गावचे एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे प्रमोद हरिभाऊ बाणखेले !
गेली पंधरा - वीस वर्षे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तळागाळातील गोरगरिबांचे प्रश्न सोडवून त्यांना मदतीचा हात देण्याचा प्रमोद बाणखेले यांनी सातत्याने प्रयत्न केला .खरे तर सर्वसामान्यांसाठी सातत्याने झटणारा आणि नागरिकांना दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता म्हणून प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांची ओळख सर्वश्रुत आहे .
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे हिंदुत्ववादी आमदार म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो असे महेशदादा लांडगे , प्रदिपदादा कंद तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ.ताराचंद कराळे , जिल्हा उपाध्यक्ष संदीप बाणखेले तसेच भाजपाचे नेते जयसिंगराव एरंडे यांच्या राजकिय मुशीत तयार झालेले प्रमोद बाणखेले आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पिंपळगाव - अवसरी खुर्द गटातून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत .
मंचर शहर आणि परिसरातील अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाणखेले यांनी गाव पातळीवर तसेच वैयक्तिक स्वरूपात अनेकांना मदत करण्याचे कार्य केले आहे . या कार्याची फलस्त्रृती म्हणून पक्षश्रेष्ठींनी त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याचे समजते . मंचर विविध कार्यकारी सोसायटीचे तज्ञ संचालक म्हणून काम करत असलेले प्रमोद बाणखेले मंचर शहर आणि आंबेगांव तालुक्याला सर्वपरिचीत आहेत .
प्रमोद बाणखेले यांचे वडील स्वर्गीय हरिभाऊ गेनुजी बाणखेले हे भारतीय सैन्यदलात देशसेवेत असतानाच प्रमोदला त्यांनी देशसेवेचे बाळकडू दिले . शेतकरी कुटुंबातील एक तरुण तडफदार व्यक्तीमत्व म्हणुन प्रमोद बाणखेले यांची ओळख राहिलेली आहे .शिक्षणानंतर बाणखेले यांनी मेडिकल व्यवसायात पदार्पण केले .गेली 25 वर्षे मेडिकल व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी सामाजिक आणि राजकीय कार्याला वाहुन घेतले आणि ते त्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वीही ठरले .
सन 2005 सालापासून त्यांनी बजरंग दलाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली . तद्नंतर हिंदू म्हणून एक विचार मनात घेऊन पहिले राष्ट्र आणि नंतर पक्ष ही संकल्पना मनाशी बाळगुन स्वतःला भाजपा या पक्षात पदार्पण करून घेतले . तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेशी नाळ जोडून त्या जनतेची सर्व प्रकारची सामाजिक व राजकीय कामे करण्याचे धोरण बाणखेले यांनी आखले . भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या 10 -15 वर्षात प्रमोद बाणखेले यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत .
भाजपामध्ये काम करत असताना प्रमोद बाणखेले यांची राजकीय कामाची तळमळ पाहून पक्षाने वरिष्ठ पातळीवर त्यांचा विचार केला आणि त्यांना आंबेगाव तालुका युवा मोर्चाचे अध्यक्षपद बहाल केले . त्या पदाच्या माध्यमातून बाणखेले यांनी अनेक समाजाभिमुख कामे केली.भारतीय जनता पक्षाने त्यांना जिल्हा सचिव म्हणून काम करण्याची संधी दिली . या सर्व कामाचा अनुभव असताना महावितरण सदस्य आंबेगाव तालुका या पदावरही त्यांना काम करण्याची संधी मिळाली . अटलबिहारी विचारमंच या नावाने जिल्हा अध्यक्ष म्हणून सामाजिक आणि आरोग्य सेवेचे काम प्रमोद बाणखेले आजतागायत करत आले आहेत . सर्वसामान्यांची कामे प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांच्या माध्यमातून होत असताना विविध क्षेत्रातील उद्योजक आणि नवीन व्यवसायातील एक होतकरू तरुण , या सर्वांचा अनुभव पाहता भारतीय जनता पक्षाने त्यांना सध्या जिल्हाध्यक्ष उद्योग आघाडी उत्तर पुणे जिल्हा या पदावर काम करण्याची संधी दिली .
दरम्यानच्या काळात भाजपा पक्षाच्या माध्यमातुन तालुक्यात वीज , रस्ते , पाणी आणि इतर अडीअडचणी सोडवण्याचा बाणखेले यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे . अटलबिहारी विचार मंचच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे सर्वात महत्त्वाचे काम गेली दहा वर्षे ते तालुक्यात करत आहे . केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे .त्यामध्ये प्रामुख्याने आयुष्यमान कार्ड ,लाडकी बहीण योजना , कामगार योजना ,शेतकरी योजना अशा इतर सर्व प्रकारच्या योजना बाणखेले यांच्या माध्यमातून सातत्याने राबविल्या गेल्या . त्यामुळे तालुक्यातील सर्व सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली .
भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना प्रमोद बाणखेले यांनी सर्वसामान्य माणसांना जोडून त्यांच्या बौद्धिक विकासाची पायाभरणी केली . शत्रूंची संख्या नाहीशी करून मित्रांची संख्या वाढवण्यात अत्यंत माहीर असलेले हे व्यक्तिमत्व सकारात्मक विचारसरणी करणारे आहे .काम करण्याची जिद्द तर त्यांच्या अंगी आहेच परंतु अहंकार , क्रोध यापासून शेकडो मैल दूर राहून परिपूर्ण स्वातंत्र्याने आणि राजकीय जीवन जगणारे प्रमोद बाणखेले हे भाजपा पक्षाची ॲसेट म्हणून कार्यरत असल्याची खात्री पटते .
000

