- राज्य
- "मतं चोरीनंतर भाजप करीत आहे उमेदवारांचीही चोरी
"मतं चोरीनंतर भाजप करीत आहे उमेदवारांचीही चोरी
काँग्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
मुंबई प्रतिनिधी
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आता मतचोरीबरोबर उमेदवार चोरी देखील करू लागला आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत एका प्रभागात बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी उमेदवारांना धमकावले गेले आहे. पैशाचे आम्हीच दाखवले आहे, असे आरोप सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
... यांचा चिखलदऱ्याच्या जमिनीवर डोळा
देवेंद्र फडणवीस यांचे एक मामेभाऊ धर्मादाय आयुक्त आहेत. ते जमिनी विकतात. चिखलदऱ्याच्या जमिनींवर यांचा डोळा आहे. त्यामुळे दुसऱ्या मामेभावाला, जो तिथे राहत नाही, त्याचे नाव मतदार यादीत घातले गेले. तिथे नगरसेवक पदावर बिनविरोध निवडून आणले गेले आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला.
... ही गुंडगिरी आता खपवून घेणार नाही
इतर उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यासाठी पैसे वाटले जातात, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, अपहरण केले जाते, ही मुख्यमंत्र्यांची गुंडगिरी आहे. यापुढे अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.
फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री
मामेभवाचा निवडणुकीत पराभव झाला असता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली असती. त्यामुळे फडणवीस यांनी या निवडणुकीत आपल्या पदाचा गैरवापर करून धमक्या दिल्या. गैरमार्गाचा वापर केला. ज्या पद्धतीने संविधानाची तोडफोड केली जात आहे तो प्रकार गंभीर आहे. भाजपामध्ये मूळ कार्यकर्ते कमी आणि भाडोत्री लोक जास्त आहेत, असे खळबळजनक आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील, असे विधानही त्यांनी केले.

