‘भाजप प्रदेश संचालन’ समितीच्या संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ यांची निवड
On
कराड, प्रतिनिधी
राज्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच महानगरपालिका निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजप प्रदेश समितीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रदेश संचालन समिती’ स्थापन केली आहे. या समितीतील कृषी क्षेत्र संपर्क समन्वयकपदी सुर्ली (ता. कराड) येथील रामकृष्ण वेताळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या संचालन समितीकडे राज्यभरातील भाजप उमेदवार निश्चिती, निवडणूक नियोजन आणि रणनीतीची अंमलबजावणी याबाबतचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. समितीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, आमदार विक्रांत पाटील, श्रीकांत भारतीय, माधवी नाईक, माधव भंडारी, केशव उपाध्ये, चित्रा वाघ, प्रसाद लाड यांचा समावेश आहे.
रामकृष्ण वेताळ यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अभिनंदन करून भविष्यातील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
000
Tags:
About The Author
Latest News
23 Nov 2025 15:03:18
पुणे: प्रतिनिधी
लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
