भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

१७ उमेदवारांचा एकमुखी विजयाचा संकल्प

“भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. मृणालताई म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली १७ उमेदवारांची मजबूत टीम जनतेच्या सेवेसाठी सज्ज

भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

वडगाव मावळ/ प्रतिनिधी

“भ्रष्टाचार मुक्त वडगांवासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वडगावमध्ये परिवर्तनाची नवी पहाट उगवेल,” असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. वडगाव आणि डोंबिवलीतील विशेष नात्याची आठवण करून देत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रचंड ऊर्जा दिली तसेच संघटनात्मक बळावर विजय निश्‍चित असल्याचे सांगितले.

भाजप-महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचाराला आज ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज आणि आई जोगेश्वरी देवींचे दर्शन घेऊन शुभारंभ करण्यात आला. भाजपा-महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ॲड. मृणालताई गुलाबराव म्हाळसकर आणि सर्व १७ उमेदवारांच्या प्रचार मोहिमेला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते नारळ फोडून प्रारंभ झाला.मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. कमळाच्या चिन्हावरील घोषणांनी संपूर्ण परिसर गाजला.

हे पण वाचा  'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'

मान्यवरांची दिग्गज उपस्थिती

या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, भाजपा प्रदेश महामंत्री राजेशजी पांडे, वडगाव नगरपंचायत निवडणूक प्रभारी भास्करराव म्हाळसकर तसेच अनेक मान्यवर आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीने उमेदवारांना प्रचंड मानसिक बळ मिळाल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.

भविष्य विकासाचा संकल्प

 प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले, “पोटोबा महाराजांच्या आशीर्वादाने वडगावमध्ये नक्कीच कमळ उमलणार आहे. पारदर्शक कारभार, स्वच्छ प्रशासन, पायाभूत सुविधा विकास आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी भाजप कटिबद्ध आहे. वडगावच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत.”

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt