संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा

संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा

पुणे : प्रतिनिधी

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत शहरात “माझे संविधान – माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत भव्य संविधान लोककला शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला आहे. संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

या शाहिरी जलशात प्रख्यात शाहीर शीतल साठे, सचिन माळी, तसेच सदाशिव निकम, पृथ्वीराज माळी आणि सहकारी कलाकार संविधान मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीची ताकद प्रभावी लोककलेद्वारे सादर करणार आहेत.

हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, भाऊ पाटील रोड, बोपोडी येथे होणार असून या परसांगि प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)युवक आघाडीचे पप्पू कागदे, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, अविनाश कदम आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

हे पण वाचा  प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुटणार अँड. मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा नारळ

याच प्रसंगी “जनसेवेतून विकासाकडे” या कार्यअहवालाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. संविधान मूल्यांचे संवर्धन, लोककलांचा जागर आणि जनसेवेच्या कार्याचा आढावा या तिन्ही गोष्टींचा संगम असलेला हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करावे, असे आवाहन परशुराम वाडेकर यांनी केले आहे.

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt