- राज्य
- लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार
लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार
मेगा एमएसएमई आऊटरीच कॅम्पेनचे यशस्वी आयोजन
पुणे: प्रतिनिधी
लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे प्रादेशिक विभागाच्या वतीने नुकतेच मेगा एमएसएमई आऊटरीच कॅम्पेनचे आयोजन करण्यात आल्याचे बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक राजेश मिश्रा यांनी सांगितले.
बँकेचे विभागीय सर व्यवस्थापक अजय कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उपक्रमात दीपक फळे, अ पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटना अध्यक्ष दीपक फळे, संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, जयंत कडे, सचिव, पिंपरी-चिंचवड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, प्रमोद जगताप, संचालक, चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रकांत पर्डेसी, माजी अध्यक्ष, FCI आदी मान्यवर आणि विविध उद्योगांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी Cent GST, Cent CA/CS, Cent Hotel, Cent Shop, Cent Business OD यांसारखे एमएसएमई क्रेडिट उत्पादने Cent Vyavsay, Cent Queen आणि Cent Salary यांसारखी CASA उत्पादने,, CKYC, Re-KYC यांचे महत्त्व आणि Pm by, PMSBY आणि APY या सामाजिक सुरक्षा योजना याबाबतची सविस्तर माहिती उपस्थित त्यांना पीपीटी द्वारे दिली.
उद्योग प्रतिनिधींनी एमएसएमई कर्जपुरवठा व क्रेडिट सुविधा देण्यासाठी बँकेच्या सक्रिय प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमात एमएसएमई प्रस्तावांचे तत्काळ मूल्यांकन, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन आणि पात्र प्रकरणांच्या जलद मंजुरीसाठी सहाय्य देखील करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप संवादात्मक सत्राने झाला, ज्यात सहभागी सदस्यांनी आपले अभिप्राय आणि अपेक्षा मांडल्या. यामुळे बँकिंग क्षेत्र व एमएसएमई उद्योगांमधील समन्वय अधिक मजबूत झाला. त्यानंतर एमएसएमई लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले.
*या कॅम्पेनमध्ये एकूण 58.90 कोटी रुपयांची एमएसएमई कर्जमंजुरी आणि 20.25 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.

