'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'

उद्धव ठाकरे यांची टीका, शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी हाती बांधले शिवबंधन

'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'

मुंबई: प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष हा कटकारस्थान करणारा, दगाफटका करणारा पक्ष आहे. त्यांनी आधी पक्ष फोडले आता घरे फोडायला निघाले आहेत. निवडणुकीच्या काळात एकीकडे जोशात काम करतानाच आपण सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. 

महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेना शिंदे गटाच्या मागाठाणे येथील अनेक शिवसैनिकांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करून मातोश्री येथे ठाकरे गटाचे शिवबंधन हाती बांधले आहे. हा खुद्द एकनाथ शिंदे आणि मागाठान्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. 

यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्या शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, भाजप आणि गद्दार यांचा ढोंगीपणा आता उघड झाला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात सतत डोळे उघडे ठेवून काळजीपूर्वक वावरणे गरजेचे असणार आहे. 

हे पण वाचा  भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात

भाजपाचा हिंदुत्वाचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे. पालघरमध्ये साधूंची हत्या केल्याचा आरोप त्यांनी ज्याच्यावर केला, त्यालाच आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यांना वाटले की हे सगळे गुपचूप पणे पार पडेल. मात्र, तसे झाले नाही. ही बाब उघड झाली. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मग त्यांनी हा प्रवेश स्थगित केला, अशी टीका ठाकरे यांनी केली. 

आता त्यांनी भाषा, प्रांतवादावरून भांडणे लावायला सुरुवात केली आहे. भाषेच्या मुद्द्यावरून कोणाचा जीव घ्या, कोणाला मारहाण करा, असे आम्ही सांगत नाही. मात्र, कोणत्याही एका भाषेने दुसऱ्या भाषेवर अतिक्रमण करू नये, कमी लेखू नये एवढेच आमचे म्हणणे आहे, असेही ठाकरे म्हणाले. भाजपचे भैय्याजी जोशी मागे घाटकोपरला आले होते. त्यावेळी त्यांनी इथली मातृभाषा गुजराती आहे, असे विधान केले होते. अशाप्रकारे विष कालवण्याचे काम ते करत आहेत आणि खापर आपल्या डोक्यावर फोडत आहेत. त्यामुळे सतर्क राहून काम करा. मनगटात ताकद असेल तर विजय दूर नाही, असेही ते म्हणाले. 

About The Author

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt