- राज्य
- शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार
शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार
निधी वाटपावरून नाराजी असल्याचे कारण
मुंबई: प्रतिनिधी
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदे गटातील सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे. निधी वाटपावरून नाराजी असल्याच्या कारणाने शिंदे गटाचे मंत्री नाराज असल्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असे सांगण्यात आले.
मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संकटग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाची चर्चा आणि त्यानंतर घोषणा होणार असल्याचे काल सांगितले गेले. मात्र, शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांनी या बैठकीवरच बहिष्कार घातला.
मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळी शिंदे गटाचे बहुतेक मंत्री मंत्रालयात उपस्थित होते. मात्र ते बैठकीला उपस्थित राहिले नाही, त्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्रपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.
हे पण वाचा कराडमध्ये सत्तासंघर्ष शिगेला : महायुती फिस्कटली, भाजपला स्वबळावर विश्वास, विरोधकांनी मोट बांधली!मात्र, खुद्द एकनाथ शिंदे उपस्थित असताना देखील त्यांच्या गटातील मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित न राहिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आलेल्या असताना धुसपूस, ती देखील मंत्रिमंडळ पातळीवरील चव्हाट्यावर आली आहे.
