- राज्य
- 'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य'
'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य'
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी मागील काही काळापासून भीती आणि देशचे वातावरण निर्माण केले असून त्यांची विचारधारा काँग्रेस पक्षाला मान्य नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने मराठी भाषेच्या अभिमानाच्या नावाखाली दहशतीचे,,देशाचे वातावरण निर्माण केले आहे. मराठीच्या नावाखाली हिंसक प्रकार घडवून आणले आहेत. या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत, असे सावंत यांनी सांगितले.
मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढावी अशी मुंबईकरांची आणि काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार आम्ही स्वबळावर लढण्चा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्यस्तरावर नैसर्गिक रित्या आमच्या आघाडीत असलेल्या पक्षांना आम्ही विश्वासात घेऊ, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरीही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांची युती होणार हे निश्चित मानले जात आहे. ठाकरे गटाने मनसेला बरोबर घेण्याचे निश्चित केल्यावर महाविकास आघाडी देखील मनसेला सामावून घेणार का, याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र काँग्रेसने सुरुवातीपासून मनसेला सोबत घेण्यास विरोध दर्शवला आहे.

