- राज्य
- राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ
अतिरिक्त बंदोबस्ताचे कारण अद्याप अस्पष्ट
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ करण्यात आली आहे. या अतिरिक्त बंदोबस्ताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कालच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर दोन घिरट्या घालत असल्याने खळबळ माकली होती.
आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर सुरक्षित लक्षणीय वाढ करण्यात आली. पोलिसांचे वाहन देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.
मातोश्री निवासस्थानावर ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून टेहाळणी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्याचप्रमाणे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, हा ड्रोन एम एम आर डी एने पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या पाहणीसाठी रीचसर परवानगी घेऊन पाठविल्याचे पोलिसांनी चौकशी अंतिम सगितले.
मात्र, राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्याचे कारण केवळ खबरदारीचा उपाय आहे की मुंबई पोलिसांना काही गोपनीय माहिती मिळाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

