- राज्य
- शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने
शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने
जोरदार घोषणाबाजी, परिस्थितीत मोठा तणाव
मुंबई: प्रतिनिधी
सांताक्रुज येथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांचे कार्यकर्ते आमने-सामने घेऊन एकमेकांशी भिडले. दोन्हीकडून परस्पर विरोधी घोषणाबाजी झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे.
ताज हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामगार संघटनेची स्थापना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. मात्र, याच हॉटेलमध्ये सध्या कामगार संघटना कार्यरत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने या स्थापनेला आक्षेप घेतला.
भारतीय जनता पक्षाच्या कामगार संघटनेत ताज हॉटेल मधील कर्मचारी सदस्यच नाहीत. तरीही भाजपकडून कामगार संघटना स्थापनेचा अट्टाहास केला जात आहे, असा आक्षेप ठाकरे गटाच्या कामगार संघटनेकडून घेण्यात आला. अर्थातच भाजप कार्यकर्त्यांनी तो मान्य केला नाही. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला. दोन्ही कामगार संघटनांचे व पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकून जोरदार घोषणाबाजी करू लागले. वातावरण तापल्याने पोलिसांनी ताज हॉटेल येथे मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.

