- राज्य
- 'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती'
'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती'
निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, या निकालावर राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांनी एकत्र येऊन ''राष्ट्रीय कार्य' हाती घेतले आहे, त्याचेच हे फलीत आहे,, अशी टीका करून राऊत यांनी या निवडणुकीतही मत चोरी झाल्याचे सूचित केले आहे.
''बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले! असे राऊत यांनी समाज माध्यमांवर नमूद केले आहे.
रोज नियमितपणे पत्रकार परिषद घेऊन राज्य आणि केंद्र सरकारला आणि सत्ताधारी भाजपल टीकेचे लक्ष्य जेवायला काय करणारे यांनी सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अल्पविराम घेतला आहे. मात्र बिहार निवडणूक निकालावर त्यांनी आवर्जून समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली

