- राज्य
- राज्याच्या त्रिमूर्तीपैकी कोणी बनिया नाही तरी त्यापेक्षा कमीही नाही
राज्याच्या त्रिमूर्तीपैकी कोणी बनिया नाही तरी त्यापेक्षा कमीही नाही
अमित शहा यांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबाबत टिपण्णी
शिर्डी: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कोणीही बनियान. मात्र, पाठपुराव्याच्या बाबतीत कोणीही बनियापेक्षा कमी देखील नाही, अशी टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे संकटात असलेल्या राज्याच्या स्थितीबाबत सरकारने तातडीने अहवाल केंद्राकडे सादर करावा. केंद्र सरकार तातडीने मदत पोहोचवेल, अशी ग्वाही देखील शहा यांनी दिली.
अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे शिर्डी येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांनी पाऊण तास बंद दाराआड चर्चा केली. यावेळी राज्यातील संकट ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अमित शहा यांनी आज लोणी येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना शहा यांनी शेतकऱ्यांना निश्चितपणे परिव नुकसान भरपाई मिळेल, अशी ग्वाही दिली. आपले सरकार हे शेतकऱ्यांची काळजी घेणारे सरकार आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकारकडून नुकसानीचा अहवाल आल्यानंतर केंद्र सरकारकडून त्वरित मदत केली जाईल, अशी खात्री शहा यांनी दिली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आघाडीच्या सर्व आमदार, खासदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक महिन्याचे वेतन देऊ केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील नामांतर अहिल्यादेवी नगर केल्याबद्दल ही त्यांनी समाधान व्यक्त केले. हे फक्त आम्हीच करू शकतो. औरंगाबादचे विचार पुढे घेऊन जाणारे हे कार्य करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.