- राज्य
- भ्रष्टाचार प्रकरणी दोन जिल्हा न्यायाधीश बडतर्फ
भ्रष्टाचार प्रकरणी दोन जिल्हा न्यायाधीश बडतर्फ
मुंबई उच्च न्यायालयाने केली कारवाई
मुंबई: प्रतिनिधी
भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेल्या दोन जिल्हा न्यायाधीशांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. सातारा आणि पालघर जिल्ह्याच्या न्यायाधीशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर जामीन मंजूर करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून जिल्हा व उच्च न्यायालयाने त्यांचा जामीनाचा अर्ज फेटाळला आहे. तसेच या पकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर निकम यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
पालघर जिल्हा व सत्र न्यायाधीश इरफान शेख यांच्यावर जप्त केलेल्या अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शेख हे मुंबईतील बॅलार्ड पिअर न्यायालयात कार्यरत असताना त्यांच्याकडे अमली पदार्थांच संबंधित खटल्याची सुनावणी सुरू होती. त्या काळात जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची शेख यांनी तस्करी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे कॉर्डिलिया क्रूझवरील पार्टीत शेख हे सहभागी झाले होते. तिथे त्यांनी नशाही केली होती मात्र, या पार्टीवर छापा घालणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने त्यांना