- राज्य
- '... तर मुंबईच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आमच्याबरोबर नको'
'... तर मुंबईच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आमच्याबरोबर नको'
आशिष शेलार यांनी अजित पवार गटाबाबत मांडली धक्कादायक भूमिका
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतलेल्या एका निर्णयावरून मंत्री अशीच शेलार यांनी त्यांच्याबाबत टोकाची भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असेल तर मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गट आमच्याबरोबर नको. केंद्रीय नेतृत्वाला मी त्याबद्दल कल्पना दिली आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापनाच्या कामात राष्ट्रवादी काँग्रेसने नबाब मलिक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, ही बाब भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. नबाब मलिक यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात भाजपने तीव्र विरोध व्यक्त केला आहे.
नबाब मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. नायटा आणि त्यांच्यावर टीका टिपणी केली आहे. त्यामुळे महायुतीच्या निवडणूक व्यवस्थापनात मलिक यांना स्थान असता कामा नये. अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी युती करू शकत नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आशिष शेलार यांच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. नवाब मलिक हे आमचे जेष्ठ आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आली ती योग्यच आहे. त्यांच्याबाबत इतर कोणाच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. महायुती भक्कम आहे. आमच्यात कोणताही विषम वात नही, असे पटेल यांनी सांगितले.

