- राज्य
- निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी महिला उमेदवाराचा गनिमीकावा
निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी महिला उमेदवाराचा गनिमीकावा
माजी आमदारांनी अटकाव करण्यासाठी गुंडांची फौज तैनात केल्याचा आरोप
सोलापूर: प्रतिनिधी
उज्वला थिटे थेट अनगर नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गनिमी कावा करून थेट अनगर नगरपंचायत कार्यालयात पहाटे 5 वाजता पोहचल्या आहेत. त्यांच्यासोबत तगडा बंदोबस्त आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अलिकडेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांचे स्वत:चे गाव असलेल्या "अनगर नगरपंचायत" सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवर गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज भरला जाऊ नये म्हणून राजन पाटील यांनी अनगरला जाणा-या सर्व रस्त्यावर गुंडांची फौज उभी केली आहे.उज्वला थिटे अर्ज भरायला जात असताना त्यांच्या गाडीचा राजन पाटलाच्या गुंडांनी पाठलाग केला.रस्त्यावर ट्रॅक्टर उभे केले.नगर पंचायत कार्यालया बाहेर गुंडांची फौज उभी केली, असा आरोप थिटे यांनी केला आहे.
उज्वला थिटे पोलिस संरक्षण मागायला मोहोळ पोलिस ठाण्यात गेल्या असता त्यांना धक्के देऊन बाहेर काढले, असा दावा थिटे यांनी केला. अनगर ग्रामपंचायत असल्यापासून सलग 60 वर्षे कुठल्या मार्गाने बिनविरोध झाली हे आत्ता आपल्या अनुभवातून संपुर्ण महाराष्ट्राला समजले आहे.स्वत:च्या सूनेला बिनविरोध नगराध्यक्ष करण्यासाठी राजन पाटील लोकशाहीचा गळा घोटत आहेत, असे आरोपही त्यांनी केले.
हे पण वाचा भोर नगरपरिषद अर्ज छाननीत ६७ अर्ज अवैध (बाद); तर नगराध्यक्ष ४ व नगरसेवक पदाचे ६१ उमेदवार रिंगणातमाझे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, जी घाण तूम्ही तूमच्या पक्षात घेतली आहे ती साफ करता करता भाजप व तुमचा हात देखील मलीन होणार आहे.राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपल्याला लोकशाही मार्गाने निवडणूक लढवू द्यावे.मी जिंकेल नाही तर हरेल.पण निवडणुकच लढवू द्यायची नाही, ही बाब महाराष्ट्रासाठी शोभणारी नाही.असे झाले तर महाराष्ट्रात देखिल "जंगलराज" आल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही थिटे यांनी दिला आहे.
