- राज्य
- शहा, फडणवीस, शिंदे व अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा
शहा, फडणवीस, शिंदे व अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा
अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि तातडीची मदत
शिर्डी: प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रात्री उशिरापर्यंत तब्बल पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे राज्यात झालेले नुकसान आणि तातडीची मदत या विषयांवर चर्चा झाली.
अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिर्डीच्या विमानतळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हॉटेल सन अँड सँड येथे या दोघांची बैठक पार पडली.
या बैठकीतच राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी अमित शहा यांनी शिर्डी देवस्थानात जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते लोणी आणि प्रवरानगर येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.