- राज्य
- शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यावर प्राणाघातक हल्ला
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यावर प्राणाघातक हल्ला
भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुपारी घेऊन हल्ला केल्याचा आरोप
सोलापूर: प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भाजपचा कार्यकर्ता मनोज लांडगे याने दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्याकडून सुपारी घेऊन आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे.
माझ्या सकाळी मी माझ्या शेतातून येत असताना मताई कारखान्याचे सर्वेसर्वा रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने माझी गाडी अडवली. त्याने मला लाठ्या, काठ्यानी, खाली पाडून बेदम मारहाण केली. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चिवटे यांनी केला आहे. आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून या पुढील काळात जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे चिवटे हे आपल्या शेतात गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला.