- राज्य
- अजितदादांचा काकांना जोरदार धक्का
अजितदादांचा काकांना जोरदार धक्का
पवार गटाचे सगळेच पदाधिकारी येणार अजितदादांच्या तंबूत
ठाणे: प्रतिनिधी
अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बहुतेक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी काकांना हा मोठा धक्का दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी आघाडी घेतली महायुतीच्या नाकी दम आणला. मात्र, विधानसभा निवडणुकी महायुतीने जोरदार कमबॅक करत अभूतपूर्व यश प्राप्त केले. विरोधकांकडून याचे वर्णन पाशवी बहुमत असे केले जात आहे. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांमधून महायुतीतील पक्षांमध्ये सुरू झाले आहे.
लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक पक्षप्रवेश राज्यातील मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये होत आहेत. शिवसेना ठाकरे गटातील लोक शिंदे गटात सामील होत आहेत तर शरद पवार घाटातील लोक अजित पवार गटात येत आहेत. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा धक्का महाविकास आघाडीला बसण्याची चिन्ह आहेत.