- राज्य
- अजितदादांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र लढणार
अजितदादांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र लढणार
बारामती नगर परिषद निवडणुकीबाबत युगेंद्र पवार यांची घोषणा
पुणे: प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात विकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एक दिलाने निवडणूक लढवणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व अपक्षांना देखील आघाडीमध्ये सामावून घेतले जाईल, असेही पवार यनी सांगितले.
आतापर्यंत बारामती नगर परिषदेत पवार यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे. मात्र, मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वेगळे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेची निवडणूक रंजक तसेच चुरशीची होणार आहे. बारामती नगर परिषदेत सत्ता राखणे हे शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा ठरणार आहे.

