- राज्य
- उपनेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
उपनेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश
नाशिक: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेना ठाकरे गटाची पडझड थांबण्याचे नाव घेत नाही. उपनेते अद्वय हिरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला ''जय महाराष्ट्र' करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाची अवस्था बिकट झाली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात,,विशेषतः मालेगाव तालुक्यात प्रभाव असलेल्या शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे हिरे हे कट्टर विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीत हिरे यांनी दादा भुसे यांना कडवी लढत दिली होती. आता हिरे हे अपूर्व हिरे, प्रसाद हिरे आणि तुषार शेवाळे यांच्यासह भाजपमध्ये आल्याने जिल्ह्यात भाजपच्या ताकदीत भर पडली आहे.
मागील अनेक दिवसापासून हिरे शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. दीर्घकाळ ते भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते. खुद्द हिरे यांनीच काही काळापूर्वी त्याची पुष्टी केली आणि आज मुंबई येथील भाजप कार्यालयात जाऊन हिरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेशही केला.

