- राज्य
- शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी
शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मारामारी
प्रकरण थेट पोहोचले पोलीस ठाण्यापर्यंत
ठाणे: प्रतिनिधी
महायुतीतील तणाव निवळावा यासाठी नेते कितीही प्रयत्न करीत असले तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमधील एकमेकांबद्दलची संतापाची भावना कमी होताना दिसून येत नाही. त्याचेच पर्यावसन शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी होण्यापर्यंत पोहोचले आहे. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत.
शहरी गरिबांना मूलभूत योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या घरांची नोंदणी केवळ शंभर रुपयांच्या मुद्रांक शुल्क आकारून करण्याच्या निर्णयाचे श्रेय उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना असल्याचा दावा करीत शिवसैनिकांनी बीएसयुपी गृहप्रकल्पांच्या ठिकाणी जल्लोष सुरू केला.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन त्याच्यावर आक्षेप घेतला. इतकेच नव्हे तर शिवसेनेचे उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखाप्रमुख हरेश महाडिक यांना भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केली, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

