मुस्लिम समाजामध्ये दादांच्या राष्ट्रवादीबाबत नाराजी

मुस्लिम समाजाची बाजू मांडणाऱ्या नेत्यांना डच्चू दिल्याची भावना

मुस्लिम समाजामध्ये दादांच्या राष्ट्रवादीबाबत नाराजी

मुंबई!: प्रतिनिधी

सातत्याने मुस्लिम समाजाची बाजू धडाडीने मांडणाऱ्या नेत्यांना स्टार प्रचारकाच्या यादीतून डच्चू देण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. रूपाली ठोंबरे आणि सलीम सारंग यांना या यादीतून वगळल्यामुळे ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे अध्यक्ष आरिफ बापू यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 

मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी सलीम सारंग यांचे मोठे योगदान असून समाजावर प्रभाव असलेल्या त्यांच्यासारख्या नेत्याला स्टार प्रचारकाच्या यादीत समाविष्ट न करणे पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे मत बापू यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारंग यांना अन्य कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. 

शनिवार वाड्यासमोर झालेल्या नमाज प्रकरणानंतर पक्षाच्या आक्रमक आणि युवा वर्गात लोकप्रिय असलेल्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी ठामपणे मुस्लिम समाजाची पाठराखंड केली. मात्र त्यानंतर त्यांचे प्रवक्ते पद काढून घेण्यात आले. त्यांना देखील कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही. पक्ष नेतृत्वाच्या अशा निर्णयामुळे अजित पवार गटाकडून मुस्लिम समाजाची उपेक्षा केली जात आहे का, असा सवाल केला जात आहे, असे बापू यांनी सांगितले. 

हे पण वाचा  ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मोठी चूक; ‘१० वर्षे स्थानिक निवडणुका नाहीत’ हा मुद्दाच का मांडला नाही? – पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी मुस्लिम समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी अनेक चांगली पावले उचलली आहेत. समाजाच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मात्र, मुस्लिमांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नेत्यांना दुर्लक्षित ठेवल्यामुळे समाजातील पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावाही बापू यांनी केला. 

 

About The Author

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt