- राज्य
- 'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'
'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'
सुषमा अंधारे यांची योगेश कदम यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पोलिसांच्या अहवालाची तमा न बाळगता गुन्हेगाराला शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असतानाही बनावट पारपत्र मिळवून परदेशात पोबारा करणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा विरोध असूनही कदम यांच्या शिफारसीमुळे शस्त्र परवाना दिल्याचा आरोप होत आहे.
कदम यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून खुनाचा प्रयत्न आणि मोक्कासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुंडाला शस्त्र परवाना देऊन बळ दिले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.