- राज्य
- निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी घातली धाड
निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी घातली धाड
बंदुकीच्या गोळ्या, मालमत्तांशी संबंधित कागदपत्र हस्तगत
पुणे: प्रतिनिधी
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांनी धाड घातली आहे. यावेळी बंदुकीच्या गोळ्या, जमिनींचे सातबारा उतारे, काही मालमत्तांची कागदपत्र आणि बीड येथील पवनचक्की प्रकल्पाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत.
घायवळच्या घरासमोर असलेल्या तीन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील एका गाडीला बनावट नंबर प्लेट असल्याचे उघडकीला आले आहे. त्याबद्दल घायवळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड येथील गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ याच्या सह त्याच्या टोळीतील अन्य गुंडांवर पोलिसांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर घायवळ हा बनावट कागदपत्र आणि खोटी माहिती देऊन पासपोर्ट मिळवून लंडन येथे रवाना झाल्याचे वरती आले आहे. पोलिसांनी घायवळ टोळी उध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे.