भोर नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर!
२० पैकी १० जागा महिलांसाठी राखीव...
भोर - प्रतिनिधी
भोर नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवार (दि.८) रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदे च्या सभागृहात जाहीर करण्यात आली. यावेळी महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. एकूण १० प्रभागांमध्ये तब्बल १० जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
लहान मुलांच्या हस्ते चिठ्या टाकून पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. हा कार्यक्रम नगरपंचायत कार्यालयात बुधवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता झाला. उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपरिषदचे मुख्याधिकारी व प्रशासक गजानन शिंदे यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, नागरिक आणि नगरपरिषदेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक राजकारणात चैतन्याचे वातावरण....
महिला आरक्षणामुळे काही प्रभागांतील इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये निराशा दिसून आली, तर काही प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्यांनी उत्साहाने तयारी सुरू केली आहे. सोडत जाहीर होताच आपणाला हवे असलेले आरक्षण पडल्यामुळे काही इच्छूक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदे समोर फटाके वाजवून आनंद व्यक्त केला तर सोशल मीडियावर "भावी नगरसेवक" नावाने पोस्ट झळकू लागल्या आहेत असून स्थानिक राजकार- णात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवार (दि.९) प्रारूप आरक्षण रचना प्रसिद्ध होणार आहे. ८ ते १३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.
अशी आहे जाहीर झालेली आरक्षण यादी
प्रभाग क्रमांक १
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ - सर्वसाधारण (महिला)
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ५
अ - अनुसूचित जाती (महिला)
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ - अनुसूचित जाती
ब - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ७
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण (महिला)
प्रभाग क्रमांक ८
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ब - सर्वसाधारण