'राज्यात विद्यमान सरकार गुंड, पुंड आणि कंत्राटदारांचे'

गुंड निलेश घायवळ याच्या संदर्भात रोहित पवार यांचे गंभीर आरोप

'राज्यात विद्यमान सरकार गुंड, पुंड आणि कंत्राटदारांचे'

मुंबई: प्रतिनिधी 

सध्याचे राज्यातील सरकार हे गुंडा पुडांचे आणि कंत्राटदारांचे असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर आल्याची टीकाही पवार यांनी केली. 

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश मारणे याचे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक नेत्यांशी निकटचे संबंध असून त्याला परदेशात पळून जाण्यासाठी याच नेत्यांनी मदत केली असावी, असा संशयही पवार यांनी व्यक्त केला. 

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, संतोष बांगर, तानाजी सावंत यांचे घायवळ याच्याशी जवळचे संबंध आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या वेळी राम शिंदे यांनी घायवळ याचा उपयोग करून घेतला होता, असा आरोप पवार यांनी केला. सर्वसामान्य लोकांना पारपत्र मिळवण्यासाठी कार्यालयात अनेकदा खेटे घालावे लागतात. मात्र, अनेक गुन्हे असलेल्या निलेश घायवळ याला सहजपणे पारपत्र मिळते. त्यानंतर तो अहमदाबाद विमानतळावरून लंडनला रवाना झाला असावा. त्याला राम शिंदे यांच्यासह धाराशिव च्या नेत्यांनी मदत केली असावी, अशी शंका पवार यांनी व्यक्त केली. 

हे पण वाचा  'सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना लोकप्रतिनिधींचे समर्थन'

एरवी खरोखर आवश्यकता असलेल्या व्यापाऱ्यांना शस्त्र परवाने मिळू दिले जात नाहीत. मात्र, निलेश घायवळ याचा अनेक गुन्हे दाखल असलेला भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाला. यामध्ये अनेक वरिष्ठांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यात राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी असू शकतात. राम शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दूरध्वनी केला असावा किंवा गृहमंत्रालयातून त्यांच्यावर दबाव आणला असावा, असेही पवार म्हणाले. 

ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातील समीर पाटील आणि निलेश घायवळ हे निकटवर्ती आहेत. त्यांची अनेक छायाचित्र आणि संभाषणाचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. पाटील यांनी घायवळ याला अनेकदा मदत केली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारात अनेकदा घायवळ दिसला आहे. नृत्यांगना गौतमी पाटील गाडीचा अपघात झाला त्यावेळी गाडीत नसताना देखील तिला उचलण्याची भाषा चंद्रकांत दादा करतात. मात्र, निलेश घायवळ याच्यासारख्या कुठल्यबाबत ते कोणतीही कारवाई करण्याबाबत पुढाकार घेत नाहीत, अशी टीकाही पवार यांनी केली. 

तानाजी सावंत यांचा या प्रकरणात थेट सहभाग नसला तरी देखील त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती यात सहभागी आहेत. पवनचक्की प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या जमिनीत हडपण्यामध्ये निलेश घायवळ याचा सहभाग होता, असा दावाही पवार यांनी केला. 

About The Author

Advertisement

Latest News

'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी' 'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी'
मुंबई प्रतिनिधी  कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल धाब्यावर बसवून शस्त्र परवाना दिल्या प्रकरणी गृहराज्यमंत्री...
भोर नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर!
'राज्यात विद्यमान सरकार गुंड, पुंड आणि कंत्राटदारांचे'
स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड
छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलू व इतिहासाच्या प्रसारासाठी साहित्य संमेलने
'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'
न्यायव्यवस्थेविषयी चाड असल्यास धर्मांध वकिलावर करा कठोर कारवाई

Advt