- देश-विदेश
- स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड
स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड
आयकर विभागाची एकच वेळी तीन राज्यात कारवाई
कोल्हापूर: प्रतिनिधी
गोव्यात कारखाना व मुख्यालय असलेल्या आणि कोल्हापूरचे निवासी असलेल्या स्टील उत्पादक उद्योजकांचे निवासस्थान, कारखाने आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाडी घातल्या असून काल सुरू झालेली झाडाझडती दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.
येथील स्टील उद्योजक अनुप बन्सल यांच्या घर आणि कागल औद्योगिक वसाहतीतील कारखान्यावर, गोव्यातील कारखाना व कार्यालयावर गोवा आयकर विभागाने एकाच वेळी धाडी घातल्या. तसेच उत्तर प्रदेशातील कारखान्यावरही धाड घातली आहे.
या स्टील उत्पादक कंपनीच्या मागील ६ वर्षात विविध बँक खात्यावरील व्यवहारांची झाडाझडती आयकर विभाग घेत आहे. त्याचप्रमाणे कंपनी आणि संचालक यांच्या नावाने विविध मालमत्ता, जमिनी, शेअर्स आणि सोन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचे आढळून आले आहे. त्यासंबंधीची कागदपत्रही आयकर विभागाने ताब्यात घेतली आहेत.
दसऱ्याला आलिशान कारची खरेदी
विशेष म्हणजे बन्सल यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आलिशान कार विकत घेतली असून तिची किंमत सुमारे दोन कोटी रुपये एवढी आहे. या गाडीला अद्याप आरटीओ नोंदणी क्रमांक देखील मिळालेला नाही. पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी हा विलंब झाला आहे.