छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलू व इतिहासाच्या प्रसारासाठी साहित्य संमेलने

साहित्यिक व संयोजक डॉ शरद गोरे यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलू व इतिहासाच्या प्रसारासाठी साहित्य संमेलने

पुणे येथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

सासवड: प्रतिनिधी

रणांगणात नेहमी अजिंक्य असलेले छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान जाज्वल्य इतिहास सर्व जगाला परिचित आहे. तब्बल १६ भाषेत पारंगत असणारे जागतिक कीर्तीचे विचारवंत, भाषा पंडित व बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख, सातशतक या ग्रंथाच्या लेखनाव्दारे 
वैश्विक विचारधन देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलूंचा व त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन
साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी केले. 

अलौकिक प्रतिभा बुधभूषण या ग्रंथातून २०१६ साली पहिल्यांदाच काव्य स्वरूपात जगासमोर आणली व छत्रपती संभाजी महाराज यांनी मानवी मूल्यांपासून राजनीती, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नैतिकशास्त्र, धर्मशास्त्र, विधीशास्त्र, न्यायशास्त्र, वनस्पतीशास्त्र, यासह विविध विषयांवर अंत्यत प्रभावी भाष्य केले आहे.

हे पण वाचा  अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे संपन्न झाले.

यावेळी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी संतोष नारायणकर तर स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योजक विजया गायकवाड तसेच परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर, सुप्रसिद्ध ग्रामीण कवी किशोर टिळेकर, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, महाराष्ट्र सरचिटणीस सुनील लोणकर, संतोष शेलार, महाराष्ट्र संघटक सचिव अमोल कुंभार, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे, पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा मगर, सुजाता गुरव, पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सुमेध गायकवाड, सरचिटणीस सुवर्णा वाघमारे, मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे, शहराध्यक्ष द्यानेश्वर धायरीकर, जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर, प्रा.सुरेश वाळेकर, मधुकर गिलबिले आदी उपस्थित होते.

ग्रंथपूजन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन असे कार्यक्रम झाले.

डॉ. गोरे यांनी केलेल्या बुधभूषणच्या काव्यानुवादाचे प्रकाशन
 
छत्रपती संभाजी महाराज लिखित बुधभूषणच्या मराठी काव्य अनुवादित केलेल्या डॉक्टर शरद गोरे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन  यावेळी करण्यात आले.
सूत्रसंचालन श्रद्धा सानप यांनी केले. तर आभार ॲड. सुमित गायकवाड यांनी मानले.

 

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी' 'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी'
मुंबई प्रतिनिधी  कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल धाब्यावर बसवून शस्त्र परवाना दिल्या प्रकरणी गृहराज्यमंत्री...
भोर नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर!
'राज्यात विद्यमान सरकार गुंड, पुंड आणि कंत्राटदारांचे'
स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड
छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलू व इतिहासाच्या प्रसारासाठी साहित्य संमेलने
'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'
न्यायव्यवस्थेविषयी चाड असल्यास धर्मांध वकिलावर करा कठोर कारवाई

Advt