'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी'

सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणी अनिल परब यांची मागणी

'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी'

मुंबई प्रतिनिधी 

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल धाब्यावर बसवून शस्त्र परवाना दिल्या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिपदवरून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केली आहे. 

पोलिसांचा विरोध असताना देखील घायवळ यांना शस्त्र परवाना कसा देण्यात आला याचा संपूर्ण घटनाक्रमच त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितला.

सचिन घायवळ याची पार्श्वभूमी पाहता पुणे पोलिसांनी त्याचा शस्त्र परवानाचा अर्ज फेटाळून लावला. घायवळ याने गृहराज्यमंत्री कदम यांच्याकडे अपील केले. त्यावेळी देखील पुणे पोलिसांनी सचिन हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील गंभीर गुन्हे दाखल होते. ते सिद्ध झाले नसले तरीही त्यांचे गांभीर्य कमी होत नाही, असे सांगत सचिन याला शस्त्र परवाना देण्यास विरोध केला, असे परब यांनी सांगितले. 

हे पण वाचा  अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा सन्मान

मात्र, सचिन याने वीस वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून काम केले आहे. ते बांधकाम व्यवसायिक आहेत. या क्षेत्रात अनेक विरोधक निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच नियमितपणे मोठ्या रकमांची देवाण-घेवाण करावी लागते. या कारणासाठी कदम यांनी त्यांचा परवाना मंजूर केला. मंत्र्यांच्या अशा निर्णयामुळे पोलिसांचे मनोबल खचते, असा दावा परब यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांना अशी कोणती अडचण आहे की ते...

योगेश कदम यांना मंत्रीपदावरून हटवावे यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. कदम यांच्यासारखे मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतात. पोरी नाचवतात आणि त्यातून मिळणारा पैसा खातात. असले मंत्री रोज खुद्द मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात. त्यांची प्रतिमा डागाळतात. तरी देखील मुख्यमंत्र्यांना अशी कोणती अडचण आहे की त्यांना असल्यानंतर यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते, असा सवाल परब यांनी केला 

योगेश कदम यांना हटवण्याची पहिली संधी आपण मुख्यमंत्र्यांना देत आहोत. त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल. आपण न्यायालयात जाऊ. लोकायुक्तांकडे दाद मागू. मात्र, कदम यांना हटवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा परब यांनी दिला. . 

About The Author

Advertisement

Latest News

 पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीचा वडगाव मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीचा वडगाव मावळ तहसील कार्यालयावर मोर्चा
वडगाव मावळ (दि. ९ ऑक्टोबर) — पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांच्या हक्कांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी...
'सध्याचा सामाजिक विसंवाद हे शरद पवार यांचे पाप'
राज्यातील कुणबी समाजाचा एल्गार मोर्चा!
'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी'
भोर नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर!
'राज्यात विद्यमान सरकार गुंड, पुंड आणि कंत्राटदारांचे'
स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड

Advt