- राज्य
- पारपत्र जप्त करून घायवळला भारतात आणणार
पारपत्र जप्त करून घायवळला भारतात आणणार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे पारपत्र जप्त करून त्याला भारतात परत आणले जाणार असल्याची ग्वाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. घायवळ याने बनावट कागदपत्र आणि खोटी माहिती सादर करून पारपत्र मिळवले असून ते रद्द करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घायवळ याने अहिल्यानगर येथील खोटा पत्ता देऊन आणि आपल्यावर राज्यभरात कुठेही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे शपथपत्र देऊन पारपत्र मिळवल्याचे उघड झाले आहे. पारपत्रसाठी अर्ज करताना त्याने घायवळ ऐवजी गायवळ असे नाव वापरले आहे.
यापूर्वी देखील घायवळ याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करून त्याला अटक करण्यात आली होती. त्याला जामीन देताना पारपत्र पोलिसांकडे जमा करण्याची अट घालण्यात आली होती. मात्र त्यानेही अट पाळली नाही. घायवळ हा 11 सप्टेंबर पासून लंडन येथे आहे.