कळंब - चांडोली बु. जि.प. गटातील चित्र स्पष्ट ?
तुलसी भोर आणि प्रीती थोरात यांच्यात होणार दुरंगी सामना
मंचर / रमेश जाधव
आंबेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या कळंब -चांडोली बु. जि.प . गटातील निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे . या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या तुलसी भोर आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणाऱ्या प्रीती थोरात यांच्यात राजकीय लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे .मागील झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुलसी भोर आणि प्रीती थोरात यांच्यात राजकीय लढत झाली होती .त्या लढतीत तुलसी भोर या वरचढ ठरल्या होत्या . त्यावेळी त्यांनी प्रीती थोरात यांना पराभवाची धूळ चारली होती . आता होणाऱ्या निवडणुकीतही तुलसी भोर आणि प्रीती थोरात यांच्यात राजकीय लढत होणार असून सध्यातरी तुलसी भोर यांचे राजकिय पारडे जड वाटते .
राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या दृष्टीने कळंब - चांडोली बु ! जिल्हा परिषद गट हा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील म्हणून ओळखला जातो . एक वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या जिल्हा परिषद गटातील नागापूर गावचे उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटील यांना राजकीय शह दिला होता निकम यांनी कळंब - चांडोली बु ! जिल्हा परिषद गटात २५०० मतांची आघाडी घेतली होती . काही दिवसात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत या गटातील उमेदवार विजयी करण्याचा चंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने बांधला असून त्या दृष्टीने स्वतः वळसे पाटील यांनी राजकीय व्युवहरचना आखल्याचे समजते .
खरे तर कळंब - चांडोली बु ! जिल्हा परिषद गटातील विरोधी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या प्रिती थोरात या मुळच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत . थोरात या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते . कारण या जिल्हा परिषद गटातील उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मिळणार आहे .त्यामुळे प्रीती थोरात यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करावाच लागणार आहे आणि तसे निश्चितही झाले आहे . साहजिकच आघाडीच्या उमेदवार म्हणुन प्रिती प्रविण थोरात यांचे नाव निश्चित झाले असल्याचे समजते .
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुलसी भोर विरोधात शिवसेनेच्या प्रीती थोरात असा राजकीय सामना झाला होता . तसाच राजकीय सामना यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे . प्रीती थोरात या मूळच्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्या आहेत . त्यामुळे त्यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली तर प्रिती थोरात यांना मतदार स्वीकारतील का ? हा महत्त्वाचा मुद्दा आहे .मुळातच हा जिल्हा परिषद गट वळसे पाटील यांना मानणारा आहे . त्यामुळे प्रीती थोरात यांच्या दृष्टीने होणारी निवडणूक जिकीरीची राहील .
दरम्यान 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तुलसी सचिन भोर यांनी त्यांच्या कार्यकाळात या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये लोकाभिमुख कामे केली . त्यामुळे या गटातील प्रत्येक गाव पातळीवर त्यांचा असणारा संपर्क हा देखील निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे . तालुक्याचे लोकप्रतिनिधी वळसे पाटील यांनी तुलसी भोर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून त्यांची कळंब - चांडोली बु ! जिल्हा परिषदेची उमेदवारी निश्चित केल्याचे समजते .
एकूणच आगामी होणारी कळंब - चांडोली बु ! जिल्हा परिषद गटाची निवडणूक तुलसी भोर विरुद्ध प्रीती थोरात अशी होण्याची शक्यता असून मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रीती थोरात यांनी या गटातील गावागावात संपर्क ठेवला नाही .त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तरी त्या कितपत यशस्वी होतात हा येणारा काळच ठरवेल . परंतु सध्या तरी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार तुलसी सचिन भोर यांचे राजकीय पारडे निश्चितच जड आहे .
000

