- राज्य
- पंचनाम्यासाठी स्वीकारणार मोबाईलवरील छायाचित्र
पंचनाम्यासाठी स्वीकारणार मोबाईलवरील छायाचित्र
अतिवृष्टी आणि पूरस्थितीला तोंड देण्यासाठी महत्त्वाच्या घोषणा
मुंबई प्रतिनिधी
दुर्गम ठिकाणी अतिवृष्टी अथवा पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करताना ड्रोन अथवा मोबाईलवर काढण्यात आलेली छायाचित्र ग्राह्य धरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थिती याला तोंड देण्यासाठी सहा महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत.
टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीलाही लागू करणार, उजनी येथे तेरणा नदीवर पूल, गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी, औराद शहाजनी येथे पूर संरक्षक भिंत, बॅरेजेसची कामेही केली जाणार, उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा व तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाच्या उभारणीला मंजुरी देणार, उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देणार, जेथे पंचनाम्यांसाठी पोहचणे शक्य नाही, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे पंचनामे तसेच मोबाईलवरील फोटोही स्वीकारणार या महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या आणि पूरग्रस्त भागाला भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यापूर्वीच आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्यानंतरही आवश्यकतेनुसार अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.