- राज्य
- कोंढवा परिसरात पोलिसांची छापेमारी
कोंढवा परिसरात पोलिसांची छापेमारी
दहशतवादी कनेक्शन असल्याचा संशय
पुणे: प्रतिनिधी
काही स्थानिक संशयितांबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी कोंढवा परिसरात छापेमारी केली आहे. या संशयितांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय असून त्याला दुजोरा देणारे काही प्राथमिक पुरावे हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काल रात्री उशीरा तब्बल १९ ठिकाणी छापे घालण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक संशयितांची चौकशी करण्यात आली. ही कारवाई आज सकाळपर्यंत सुरू होती.
ज्या ठिकाणी छापे घालण्यात आले त्या ठिकाणचे आणि चौकशी केली गेलेले संशयित लोक यांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासण्यात आहे. ही कारवाई राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या पूर्वीदेखील कोंढवा परिसरात बाहेरून येऊन शहरात दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करणाऱ्या दहशतवाद्यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अटक केली आहे. त्यामुळे हा परिसर आणि तिथल्या घडामोडींवर पोलिसांची बारीक नजर आहे.