भोर नगरपरिषद अर्ज छाननीत ६७ अर्ज अवैध (बाद); तर नगराध्यक्ष ४ व नगरसेवक पदाचे ६१ उमेदवार रिंगणात
On
भोर, प्रतिनिधी
भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर नगरसेवक पदासाठी १२४ अर्ज दाखल झाले होते. मंगळवार (दि.१८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ८ उमेदवारी अर्जा पैकी ४ अर्ज अवैध (बाद) झाले आहेत. तर नगरसेवक उमेदवारी १२४ अर्जा पैकी ६३ उमेदवारी अर्ज अवैध (बाद) झाले असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी चे असे एकूण ६७ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी वैध अर्ज...
नगराध्यक्ष पदासाठी रामचंद्र श्रीपती आवारे, कविता अरुण खोपडे, नितीन बबन सोनावले, संजय दत्तात्रय जगताप या चार जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी या चार उमेदवारात लढत होईल का ते प्रत्यक्षात अर्ज माघारीनंतरच अधिक चित्र स्पष्ट होईल.
प्रभागानुसार वैध उमेदवार.....
नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक १ मधून ५ उमेदवार, प्रभाग क्रमांक २ मधून ६ उमेदवार, प्रभाग क्रमांक ३ मधून ५ उमेदवार, प्रभाग क्रमांक ४ मधून ५ उमेदवार, प्रभाग क्रमांक ५ मधून ६ उमेदवार, प्रभाग क्रमांक ६ मधून ९ उमेदवार, प्रभाग क्रमांक ७मधून ६ उमेदवार, प्रभाग क्रमांक ८ मधून ८, उमेदवार प्रभाग क्रमांक ९ मधून ४ उमेदवार, प्रभाग क्रमांक १० मधून ४ उमेदवार, असे एकूण ६१ नगरसेवक उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर ६३ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत.
000
Tags:
About The Author
Latest News
23 Nov 2025 15:03:18
पुणे: प्रतिनिधी
लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
