प्रा लक्ष्मण हाके यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर जीवघेणा खाल्ला
चाळीस-पन्नास जणांच्या जमावाने लाठ्या काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी केली मारहाण
बीड: प्रतिनिधी
इतर मागासवर्गीयांचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते पवन कंवर यांच्यावर 40-50 जणांच्या जमावाने जीव घेणा हल्ला केला पवन यांच्यासह त्यांच्या तिघा साथीदारांना देखील मारहाण करण्यात आली आहे. पवन हे गंभीर जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या मराठा आणि ओबीसी यांच्यात तणावाचे वातावरण आहे. त्याला आता हिंसक वळण लागत असल्याचे दिसून येत आहे. पवन कंवर हे त्यांच्या तीन साथीदारांसह सावरगावजवळ एका धाब्यावर जेवण करत असताना चाळीस, पन्नास जणांचा जमाव तिथे आला. त्यांनी कंवर यांना लाठ्या काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले.
कंवर यांच्या सहकाऱ्यांनी मध्ये पडून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. हे तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. कंवर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
दुसरे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनाला दोन दिवसांपूर्वी पेटवून देण्याचा प्रयत्नही झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी विश्वंभर तिरुखे याला अटक केली आहे. तिरुखे हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा कट्टर समर्थक असल्याचे मानले जाते. या जाळपोळ प्रकरणाला जरांगे यांची फूस असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.