- राज्य
- वडगाव मावळ नगराध्यक्षपदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे लक्ष
वडगाव मावळ नगराध्यक्षपदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे लक्ष
वडगाव मावळ/ सतिश गाडे
तीन चार वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडतीची तारीख 6 ऑक्टोबर तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. कोणत्या संवर्गासाठी आरक्षित होते यामुळे हौशे, नवशे इच्छुक उमेदवार धास्तावले असून आपल्यासाठीच आरक्षण निघावे यासाठी देव पाण्यात बुडवले असल्याची चर्चा सुरू आहे.
मागील महिन्यांपूर्वी वडगाव मावळ नगरपंचायच्या एकूण १७ प्रभाग रचना झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजपा, शिवसेना शिंदे गट अन्य पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची गर्दीही झाली. इच्छुक व पक्षाकडून उमेदवारी मिळणार्या अनेकांनी आपल्या प्रभागात जनसंपर्कही सुरू केला. नुकत्याच झालेल्या नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमानिमित्त संभाव्य उमेदवारांचे मोठमोठे पोस्टर व बॅनरही शहरात झळकत आहे. प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीसुद्धा केली आहे. कोेणत्या पक्षाकडून कोण उभा राहणार? याबाबतची चर्चाही शहरात रंगत आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे..
नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपापल्या पक्षातील इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांची कमान सांभाळावी लागणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम उमेदवार देण्यावर प्रमुख राजकीय पक्षाचा भर राहणार आहे.वडगाव मावळ नगरपंचातीची होणारी ही निवडणूक चार पाच वर्षानी होत असल्याने या निवडणुकीचे इतिहासाच्या दृष्टीने विशेष महत्त्व राहणार आहे.
महिला सर्वसाधारण आरक्षण लागल्यास इच्छुक
नगराध्यक्ष पदासाठी जर सर्वसाधारण महिला आरक्षण लागले, तर अनेक इच्छुक महिला नेत्यांनी आपले दावे आधीच मजबूत केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक इच्छुक महिला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे
मात्र महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वडगाव शहर भारतीय जनता पक्षाने “वेट अँड वाॅच”ची भूमिका घेतल्याचे दिसत त्यामुळे भाजप नेमकी कोणाला उमेदवारी देते याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
भाजप सध्या प्रतीक्षेच्या भूमिकेत असला तरी आरक्षणानंतर त्यांच्या हालचाली निर्णायक ठरू शकतात.महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) एकत्र लढणार की स्वतंत्र? हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र जर महायुती एकत्रपणे लढली, तर वडगावमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकते.
.
About The Author
